सरकारविरोधी आंदोलनात इराकमध्ये ३१९ नागरिकांचा मृत्यू 

भ्रष्टाचार, आर्थिक सुधारणा करण्यात सरकारला आलेले अपयश, बेरोजगारी आदी कारणांवरून नागरिकांनी पंतप्रधानांच्या त्यागपत्राची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी आंदोलनाद्वारे केली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असल्याने ते थांबवण्यासाठी सुरक्षादल प्रयत्न करत आहेत.

रोहिंग्या मुसलमान बांगलादेशासह भारतीय उपखंडासाठी धोकादायक ! – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना

म्यानमारमधून येथे वास्तव्याला आलेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशासह भारतीय उपखंडासाठी धोकादायक आहेत, असे विधान बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे. त्या येथे आयोजित केलेल्या एका जागतिक परिसंवादात बोलत होत्या.

इस्रायलने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये पॅलेस्टिनियन आतंकवादी गटाचा कमांडर ठार

भारतानेही अशा प्रकारे थेट आक्रमण करून हाफिज सईद आणि अन्य आतंकवादी यांसह त्यांचे तळ नष्ट करावेत !

पंजाबमध्ये महिलेसह २  खलिस्तानवादी आतंकवाद्यांना अटक

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मोठ्या नेत्यांच्या हत्येचा होता कट

बांदीपोरा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार

श्रीनगर येथील बांदीपोरामधील परिसरात काही आतंकवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलांना १० नोव्हेंबरला सायंकाळी मिळाली होती.

‘गजवा-ए-हिंद’(भारतावर आक्रमण करणे आणि भारताला इस्लाममय करणे) नावाचे ‘अ‍ॅप’ उपलब्ध करून देणार्‍या गूगलचा सामाजिक माध्यमांतून विरोध

गूगलकडून अशा प्रकारची सुविधा उपलब्ध केल्याच्या प्रकरणी केंद्र सरकारने गूगलवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि पुन्हा असे कोणी करण्याचे धाडस करू नये, असा धाक निर्माण केला पाहिजे !

नेपाळच्या सीमेवरून ७ जिहादी आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत

नेपाळ सीमेवरून ७ आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. यानंतर सीमेवर सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

पाककडून कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रचारासाठी खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे

कॉरिडॉरच्या जवळच्या परिसरात आतंकवाद्यांचा तळ कार्यरत असणे, खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे प्रसारित होणे यातून पाक कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतावर आतंकवादी कारवाया करू पाहत आहे. यातून पाकचे खायचे आणि दाखवायचे दात हे वेगळेच आहेत, हेच पुन्हा एकदा दिसून येते.

नेपाळ बनला जिहादी आतंकवाद्यांचा नवीन अड्डा ! – अमेरिकेचा अहवाल

पाकिस्तानमध्ये ज्या आतंकवादी संघटनांनी आक्रमणे केली, त्यांच्यावरच पाकने कारवाई केली आहे; परंतु ज्या आतंकवादी संघटनांनी भारतात आतंकवादी कारवाया केल्या, आक्रमणे केली, त्यांच्यावर पाककडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

इस्लामिक स्टेट भारतावर आक्रमणाच्या सिद्धतेत – अमेरिका

आयएस् (इस्लामिक स्टेट) या आतंकवादी संघटनेचा खुरासान ग्रुप (समूह) म्हणजेच ‘इसिस-के’ या गटाने गतवर्षी भारत देशावर आत्मघाती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता; पण तो अयशस्वी झाला होता. असे असले, तरी भारत देश इसिसच्या निशाण्यावर आहे.