Zakir Naik In Pakistan : हिंदुद्वेष्टा झाकीर नाईक याने पाकिस्तानात माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची घेतली भेट !

हिंदुद्वेष्टा झाकीर नाईक आणि पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – हिंदुद्वेष्टा इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक याने  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी अन् पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांची रायविंड येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत विविध सूत्रांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू महंमद हाफीजनेही झाकीर नाईक याची भेट घेतली होती. हिंदुद्वेष्ट्या झाकीर नाईकच्या या भेटीविषयी सामाजिक माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पाकिस्तानचे क्रिकेटपटू महंमद हाफीजवर टीका !

पाकिस्तानचे क्रिकेटपटू महंमद हाफीजने झाकीर नाईकसमवेतच्या भेटीची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली आणि ‘झाकीर नाईकसमवेतची आनंददायी भेट’ असे लिहिले. महंमद हाफीजच्या या पोस्टवर सामाजिक माध्यमांच्या वापरकर्त्यांनी तीव्र  प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘भारतीय क्रिकेट संघ आणि भारत सरकार पाकिस्तानात येऊ इच्छित नाही याचे हेच कारण आहे.’ दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘जेव्हा तुम्ही आतंकवाद्याचे स्वागत करता, तेव्हा भारत पाकिस्तानमध्ये खेळेल का ?’

झाकीर नाईक भारताला हवा आहे. त्याच्यावर पैशांची अफरातफर (मनी लाँड्रिंग),  कट्टरतावादाला प्रोत्साहन देणे, हिंदु देवतांचा अत्यंत खालच्या थराला जाऊन अवमान करणे इत्यादी अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्याच्या विखारी जिहादी प्रचारातून अनेकांनी प्रेरणा घेऊन भारतात, तसेच अन्य देशांमध्येही आतंकवादी कारवाया केल्या आहेत. झाकीर नाईक गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानला भेट देऊन गेला होता. त्यावेळी नाईक याने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांची भेट घेतली होती.

संपादकीय भूमिका

‘हिंदुद्वेष’ आधार असलेल्या पाकिस्तानात झाकीर नाईक याच्यासारख्या आतंकवाद्याचे स्वागत होते, यात काय आश्‍चर्य ?