हिमाचल प्रदेशमध्ये पंजाबमधील शीख पर्यटकांची गुंडगिरी

दुचाकींवर लावले होते खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवालेचे छायाचित्र असणारे झेंडे !

कुल्लू (हिमाचल प्रदेश) – कुल्लू आणि उना जिल्ह्यांमध्ये पंजाबमधून दुचाकींवरून आलेल्या पर्यटकांनी गुंडगिरी केल्याचे समोर आले आहे. या शीख तरुणांनी दुचाकींवरून खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवालेचे छायाचित्रे असणारे मोठे झेंडे घेऊन कुल्लू-मनालीच्या दिशेने मार्गक्रमण केले. उना येथे या शीख तरुणांनी हिमाचल पोलिसांच्या गृहरक्षक दलाच्या सैनिकाला मारहाण केली. तसेच कुल्लूमधील मणिकर्ण येथे त्यांनी पोलिसांनी लावलेले अडथळे (बॅरिकेडस्) तोडले. (हे हिमाचल प्रदेश प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पद ! – संपादक)

१. मणिकर्ण गुरुद्वारा सिंह साहिब येथे आलेल्या पंजाबमधील शीख तरुणांनी सुरक्षा पुरवणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले.

२. हिमाचल पोलीस मूक प्रेक्षक बनून आहेत आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. (हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणे, म्हणजे खलिस्तान्यांचे समर्थन करण्यासारखे आहे ! – संपादक)

३. कुल्लूमधील रायसन येथे शीख तरुण आणि स्थानिक तरुण यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तान समर्थकांचा वाढता उत्पात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !