India Slams Pakistan In UN : पाकिस्तानची आतंकवादी मानसिकता सर्वांनाच ठाऊक असून ती पालटणार नाही !

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘इस्लामोफोबिया’चा (इस्लामविषयीच्या द्वेषाचा) सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पाकने जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्यावर भारताने पाकला फटकारले. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी पाकला सुनावतांना म्हटले की, सवयीप्रमाणे पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी आज भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचा अयोग्य उल्लेख केला. वारंवार दिले जाणारे संदर्भ त्यांच्या दाव्याची निश्‍चिती देणार नाहीत किंवा सीमापार आतंकवादाच्या त्यांच्या कृतीचे समर्थन करणार नाहीत. पाकिस्तानची आतंकवादी मानसिकता सर्वांनाच ठाऊक आहे आणि हे वास्तव पालटणार नाही. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहील.

पार्वतानेनी हरीश म्हणाले की, आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्याला कट्टरतावादी मानसिकता आणि ‘इस्लामोफोबिया’ यांविरुद्ध काम करण्याची आवश्यकता आहे. अलीकडेच प्रार्थनास्थळे आणि धार्मिक समुदाय यांना लक्ष्य करणार्‍या हिंसाचारात चिंताजनक वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. ही केवळ आपल्यासाठी चिंतेची गोष्ट नाही, तर सर्वांनी यावर एकत्र काम केले पाहिजे. आपण हे देखील सुनिश्‍चित केले पाहिजे की, कट्टरतावादाला प्रोत्साहन दिले जाणार नाही.

संपादकीय भूमिका

कुत्र्याची शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते, तसे पाकचे आहे. शेपूट सरळ करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ती कापणेच योग्य ठरते !