Ranjani_Srinivasan Visa : हमासचे समर्थन करणार्‍या भारतीय विद्यार्थिनीचा व्हिसा अमेरिकेने केला रहित

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील कोलंबिया विद्यापिठात शिक्षण घेणारी  भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन् हिचा व्हिसा अमेरिकेकडून रहित करण्यात आला आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने आरोप केला आहे की, ‘श्रीनिवासन् हिंसाचार आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन देणार्‍या अन् हमासला पाठिंबा देणार्‍या कारवायांमध्ये सहभागी होती.’ व्हिसा रहित झाल्यानंतर रंजनीने अमेरिका सोडली.

संपादकीय भूमिका

भारताने अमेरिकेकडून प्रखर राष्ट्रप्रेम शिकून भारतातही कुणी आतंकवादी संघटनांचे समर्थन करत असेल, तर त्यालाही भारतातून हाकलून लावले पाहिजे !