
पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षे होऊन गेली असतांना आता तो भीकेला लागलेला आहे. भीकेकंगाल देश म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाकचा अपमान होऊनही ‘पडलो, तरी नाक वर’ या वृत्तीच्या पाकमधील मुसलमानांनी स्वतःचा हेका सोडल्याचे काही चिन्ह नाही. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकच्या जाफर एक्सप्रेसला कह्यात घेऊन बलुची लोकांमधील पाकिस्तानच्या विरोधातील तीव्र रोष व्यक्त केला. नेहमीप्रमाणे पाकच्या सैन्याने लोकांना कसे वाचवले ? हे आक्रमण अफगाणिस्तानमधून कसे चालवले गेले ? भारताचाही यात हात आहे, असे नाना आरोप केले. स्वतःची कमकुवत बाजू सावरण्यासाठीचे तोडकेमोडके प्रयत्न करतांना पाकला आपण स्वतःची फजिती करून घेत आहोत, हे उमगत नाही, ही त्याची स्थिती आहे. खनिजसंपत्तीने विपुल असलेल्या आणि जवळजवळ पाकचे अर्धे क्षेत्रफळ असलेल्या बलुचिस्तान प्रदेशाला गेल्या ७७ वर्षांत पाकने लुटून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आणि तेथील मूळ बलुचींवर मोठा अत्याचार अन् हिंसाचार केला आहे. आजच्या स्थितीत पाकमध्ये गरिबीचे प्रमाण ४४ टक्के आहे, तर त्याच पाकचा भाग असलेल्या बलुचिस्तानमधील गरिबीचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. मुसलमान आधी काफिरांच्या विरोधात जिहाद करतात आणि काफिरांवर वर्चस्व मिळवले की, आपापसांतच भांडतात, हा इतिहास आहे. स्वतःच्या देशातील लोकांना भीकेला लावलेल्या पाकने जे पेरले, तेच उगवले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्या साहाय्याची बलुची लोकांना आशा
बलुचिस्तान पाकच्या हाताबाहेर केव्हाच गेला आहे. जेव्हा जेव्हा पाकच्या संसदेत बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केले गेले, तेव्हा ते दाबण्यात आले. बलुचिस्तानची ही स्थिती पाहून सप्टेंबर २०२४ मध्ये पाकमधील ‘बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगल’ पक्षाचे अध्यक्ष असलेले तेथील खासदार यांनी त्यांच्या खासदारकीचे त्यागपत्र दिले होते. ‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट’ या संघटनेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला भारताचा पाठिंबा मागितला होता. भारतासमवेत अन्य शेजारी देशांमध्ये आतंकवादी पाठवणार्या पाकने सिंध आणि बलुचिस्तान या दोन्ही प्रांतांना तालिबान, इस्लामिक स्टेट, लष्कर-ए-झंगवी, लष्कर-ए-तोयबा आदी आतंकवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण केले आहे. बलुचिस्तान चीनला विकण्यात आले आहे. त्यामुळे सिंध आणि बलुचिस्तान यांना पाकपासून स्वतंत्र करण्याची मागणी पाकमधील ‘मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट’ पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांनी संयुक्त राष्ट्रे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संसद आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याकडे पत्र लिहून केली होती. पाकमधील लोकप्रतिनिधींनी स्वतःच या बलुचिस्तान आणि सिंध येथील परिस्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली आहे.
पाक बलुची लोकांवर गेली ७७ वर्षे अत्याचार करत आहे. त्यामुळे जसे पूर्व बंगालचा बांगलादेश करण्यात भारताने साहाय्य केले, तसे आता बलुचिस्तानसाठी भारताने पावले उचलावीत, असे अनेक बलुची नेत्यांना वाटते. वर्ष १९४७ मध्ये तत्कालीन भारतीय पंतप्रधान नेहरू यांनी बलुचिस्तानच्या संदर्भात केलेली चूक सुधारण्याची संधी भारताला पुन्हा मिळाली आहे. त्यासाठी भारताने उघडपणे बलुची नागरिकांना पाठिंबा दर्शवला पाहिजे. खलिस्तान आणि काश्मीर यांच्या नावाखाली भारताचे तुकडे करू पहाणार्या शक्तींना शह देण्यासाठीही भारतासाठी ही चांगली संधी आहे. जागतिक मुत्सद्दी म्हणून लौकिक असलेले आणि कणखर नेते असलेले भारताचे पंतप्रधान मोदी अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी बलुचिस्तानच्या या लढाईत त्यांना साहाय्य करून बलुची नागरिकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
खलिस्तान आणि काश्मीर यांच्या नावाखाली भारताचे तुकडे करू पहाणार्या शक्तींना शह देण्यासाठी बलुचिस्तानला साहाय्य ही भारतासाठी संधी ! |