Pakistan Renovate Temples Gurdwaras : पाकिस्तान सरकार मंदिर आणि गुरुद्वार यांच्या जीर्णाेद्धारासाठी १ अब्ज रुपये खर्च करणार ! – सय्यद अतौर रहमान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकारने देशातील मंदिरे आणि गुरुद्वार यांचा जीर्णाेद्धार अन् सुशोभीकरण करण्यासाठी एक प्रमुख योजना चालू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत १०० पाकिस्तानी कोटी रुपये खर्चून या धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण केले जाईल. सय्यद अतौर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रेहमान म्हणाले की, या योजनेच्या अंतर्गत अल्पसंख्य समुदायांच्या प्रार्थनास्थळांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातील. बोर्डाला यावर्षी १ अब्ज रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.

संपादकीय भूमिका 

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आम्ही अल्पसंख्य समुदायासाठी काही तरी करतो’, हे दाखवण्यासाठी पाकिस्तान नाटक करत आहे, हेच यातून दिसून येते. आजही तेथे हिंदूंची असंख्य मंदिरे पाडली जात आहेत, त्याचे काय ? पाकिस्तानला जर खरोखरंच तेथील अल्पसंख्यांकांविषयी काही करायचे आहे, तर त्याने प्रथम तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत !