ब्रिटनमध्ये गेल्या १० वर्षांत २० टक्के लोकांकडून मांसाहार ग्रहण करण्याच्या प्रमाणात घट

शाकाहाराचे महत्त्व हळूहळू का होईना पाश्‍चात्त्यांना कळू लागले आहे, हेही नसे थोडके !

बेंगळुरू येथील १६ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका

न्यायालयामध्ये यासाठी याचिका का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ध्वनीप्रदूषण होत असल्याचे लक्षात का येत नाही ? कि ते बहिरे आहेत ?

गेल्या ५० वर्षांच्या काळात दुष्काळामुळे ६ लाख ८० सहस्र लोकांचा मृत्यू ! – जागतिक हवामानशास्त्र संघटना

विज्ञानामुळे झालेली ही ‘प्रगती’ समजायची का ?

जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरियावरील पहिल्या लसीला संमती

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधात्मक लस ‘आर्टीएस्, एस/एएस्०१’ला मान्यता दिली आहे. मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या आफ्रिकी देशांना प्रथम ही लस देण्यात येणार आहे.

‘रामायण’ मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन

दूरदर्शनवरील अत्यंत लोकप्रिय हिंदी मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे ५ ऑक्टोबर या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते.

प्रयागराज येथील हुतात्मा चंद्रशेखर आझाद पार्कमधील सर्व अतिक्रमणे हटवा ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

पार्कमध्ये अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशी अतिक्रमणे हटवण्याची मागणी करण्यासाठी न्यायालयापर्यंत का जावे लागते ? प्रशासन ते का करत नाही ? प्रशासनातील अशा कामचुकार आणि निष्क्रीय संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

भारतातील मुसलमान धर्मगुरूंनी अफगाणिस्तानमधील महिलांवरील अत्याचारांचा निषेध करावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

संपूर्ण देशात केवळ डॉ. स्वामी हेच एकमेव राजकारणी आहेत, जे अशी मागणी करत आहेत. अन्य राजकारण्यांना अशी मागणी करावी, असे का वाटत नाही ? कि  ‘तालिबान जे करत आहे, ते योग्य आहे’, असे मुसलमानांची मते मिळण्यासाठी राजकारण्यांना वाटते ?

सिक्कीममध्ये १ जानेवारी २०२२ पासून प्लास्टिकच्या बाटलीत पाणी विकण्यावर बंदी

लहानशा सिक्कीम राज्याला जे करता येते, ते देशातील अन्य राज्यांना, तसेच केंद्र सरकारला का करता येत नाही, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे बांगलादेशी मुलींना जाळ्यात ओढून भारतात वेश्याव्यवसायामध्ये ढकलणार्‍या बांगलादेशी घुसखोराला अटक !

बांगलादेशी घुसखोर भारतात घुसून अवैध कारवाया करत असतांना भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ?

‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !

सातत्याने हिंदूंच्या सणांच्या वेळीच असे सल्ले कसे दिले जातात ? नाताळच्या वेळीही ख्रिस्त्यांकडून रस्त्यांवर फटाके फोडले जातात, तेव्हा कुणीच का बोलत नाही ? बकरी ईदला रस्त्यावर गोहत्या केली जाते, बकर्‍याची हत्या केली जाते, तेव्हा लोक विरोध का करत नाहीत ?