“CHHAVA” Delhi Reaction : देहलीमध्ये युवकांनी अकबर आणि हुमायू नावाच्या रस्त्यांच्या फलकांना फासले काळे !

रस्त्यांची नावे पालटण्याची केली मागणी !

छावा चित्रपट पाहिल्यानंतर काळे फासलेले देहली येथील अकबर, आणि हुमायू रोडचे फलक !

नवी देहली : छावा चित्रपट पहिल्यानंतर काही युवकांनी देहलीतील अकबर रोड, आणि हुमायू रोड येथे जाऊन त्या फलकांना काळे फासले. या रस्त्यांची नावे पालटण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र लावले. छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार केला. त्यांनी ही नावे पालटण्यासह मोगल शासकांचा इतिहास शिकवण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचा इतिहास शिकवण्याची मागणी केली. या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. हा घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

त्याच फलकांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र ही लावले !

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि देहली महानगरपालिकेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोचले. त्यांनी काळे फासण्यात आलेले फलक स्वच्छ केले. तसेच पोलिसांनी फलकांना काळे फासणार्‍या युवकांचा शोध चालू केला आहे. (चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. युवकांनी फलकांना काळे का फासले हे जगजाहीर असतांना युवकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मर्दुमकी दाखवण्याऐवजी प्रशासन आणि पोलीस यांनी हे फलक हटवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – संपादक) त्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत आहेत.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर राजधानी देहलीमध्ये मोगल आक्रमकांच्या नावाचे रस्ते असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांना असे असू नये, अशीच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ ही नावे पालटली पाहिजेत !