|
मुंबई – महाराष्ट्र सायबर सेलने ४ विकिपीडिया संपादकांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह लिखाण न काढल्याचा आरोप. सायबर सेलने यापूर्वी अमेरिकास्थित विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून वादग्रस्त लिखाण काढण्याची मागणी केली होती; पण विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. प्रतिसाद न मिळाल्याने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली.