३ जणांना अटक; १ जण पसार

पुणे – कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतून दुचाकी घेऊन जाणार्या संगणक अभियंता देवेंद्र जोग या युवकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी सराईत गुन्हेगार गजानन मारणे याच्यासह साथीदारांविरोधात ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गजानन मारणे पोलीस ठाण्यात उपस्थित न झाल्यास कारवाईची चेतावणी दिली होती. २४ फेब्रुवारी या दिवशी मारणे हा आईसह कोथरूड पोलीस ठाण्यात शरण आला. पोलिसांनी मारणे टोळीतील ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ आणि अमोल तापकीर यांना अटक केली आहे. श्रीकांत उपाख्य बाब्या पवार हा पसार झाला आहे.