Tajikistan Hijab Ban : ताजिकिस्तान ‘विदेशी इस्लामी प्रभाव’ दूर करणार : पारंपरिक कपड्यांना प्रोत्साहन देणार !

देशात हिजाबवर, तसेच दाढी ठेवण्यावर आहे बंदी

ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमन

दुशंग्बे (ताजिकिस्तान) : मध्य आशियातील मुसलमानबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानमध्ये महिलांच्या कपड्यांविषयी लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांनी कोणत्या वयात, कोणत्या प्रसंगी आणि कुठे कोणते कपडे घालावेत, याविषयीच्या शिफारसी असतील. अलीकडच्या वर्षांत ताजिकिस्तान सरकारने ‘पारंपरिक’ ताजिक कपड्यांना प्रोत्साहन दिले आहे आणि राष्ट्रीय संस्कृतीच्या विरुद्ध मानल्या जाणार्‍या कपड्यांवर बंदी घातली आहे. तसेच सरकार ‘विदेशी इस्लामी प्रभाव’ दूर करण्यास प्रयत्नरत आहे.

ताजिकिस्तान सरकारचे ‘पारंपरिक’ ताजिक कपड्यांना प्रोत्साहन !

१. वर्ष १९९२ पासून सत्तेत असलेले राष्ट्रपती इमोमाली रहमन यांनी यापूर्वी इस्लामी हिजाबचे समाजासाठी एक समस्या म्हणून वर्णन केले होते. त्यावर देशात बंदी आहे. त्यांनी महिलांना ‘ताजिक शैली’मध्ये कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारने देशात लांब दाढी ठेवण्यावर अनौपचारिकपणे बंदी घातली आहे.

२. वर्ष २०१५ च्या प्रारंभी अनेक ताजिक नागरिक ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेत सामील झाले होते. या घटना लक्षात घेता, ताजिकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

३. ताजिकिस्तानमध्ये सुमारे ९८ टक्के लोकसंख्या इस्लाम धर्माचे पालन करते. इतक्या मोठ्या संख्येने मुसलमान लोकसंख्या असूनही देशाचे प्रशासन औपचारिकपणे धर्मनिरपेक्ष सरकार म्हणून काम करते.

संपादकीय भूमिका 

ताजिकिस्तनासारखा इस्लामी देश हिजाब, दाढी यांसारख्या गोष्टींना प्रोत्साहन न देता स्थानिक परंपरेला महत्त्व देतात. भारतातील मुसलमान मात्र भारतीय परंपरा न अंगीकारता अरबी परंपरा पालन करण्याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक !