कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेनेच्या शहरप्रमुखावर गोळीबार !

‘महेश गायकवाड यांनी कुंपण तोडून माझी भूमी कह्यात घेतली. मी त्यांना न्यायालयाकडून ऑर्डर आणण्यास सांगितले; पण त्यांनी दादागिरी चालूच ठेवली’, असे भाजपचे गणपत गायकवाड यांनी सांगितले.

Kolhapur Madrasa Demolished : अवैध मदरशाचे बांधकाम भुईसपाट !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !

विटा-खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन !

न्यूमोनियाच्या संसर्गामुळे त्यांना ३० जानेवारी या दिवशी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

धर्म आणि देश यांच्या संरक्षणासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा व्हावे लागेल ! – टी. राजासिंह

हिंदुत्वनिष्ठांसमवेत हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना केली असून त्या माध्यमातून हे अतिक्रमण काढण्यासाठी लढा चालू आहे.

शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांना ‘ई-मेल’द्वारे धमकी !

शिवसेनेचे सचिव तथा प्रवक्ते किरण पावसकर यांना ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांनी ‘तुम्ही मातोश्रीच्या विरोधात बोलू नये’, अशी ईमेलद्वारे धमकी दिली आहे. सुभाष विचारे हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत.

भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २१ जानेवारीला सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय झाली होती.

२२ जानेवारी या दिवशी वाशीम जिल्ह्यात मद्य, मांस बंदी करा !

२२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात मद्य, मांस व्यवहार बंद ठेवावे, यासाठी सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाकडून ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस

याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

उद्धव ठाकरे गटाची पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात याचिका !

‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्या’चा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निकालच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश !

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी १४ जानेवारी या दिवशी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.