
मुंबई – रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महारस्ता रोखून आंदोलन केले. शिवसैनिक अप्रसन्न असल्याचे यातून दिसून आले. या घटनेनंतर काही घंट्यांमध्येच रायगड आणि नाशिक यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली.
पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून सुटला नव्हता. शेवटी पालकमंत्र्यांच्या नावाची सूची घोषित होऊन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे गेले, तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या नावाची निवड करण्यात आली होती.
शिवसेनेने रायगड आणि नाशिक जिल्ह्याची मागणी स्वत:कडे केली होती; मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने एकनाथ शिंदे अप्रसन्न असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना संपर्क केल्यावर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची घोषणा रोखण्यात आली.