उंचगावमध्ये ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध ! – राजू यादव

कोल्हापूर – उंचगाव वेथे वीज वितरण आस्थापन ग्राहकांना ‘प्रिपेड लाईट मीटर’ बसवण्याची सक्ती करत आहेत. ग्राहक  अदाणी आस्थापनेच्या ‘स्मार्ट मीटर’ला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून खासगीकरणाचा डाव आखला जात आहे. उंचगावमध्ये ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवण्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध असून ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती करू नये, असे निवेदन ठाकरे गटाच्या वतीने वीज वितरण आस्थापनास देण्यात आले. हे निवेदन साहाय्यक अभियंता अमोल गायकवाड यांनी स्वीकारले.

या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, शरद माळी, कैलास जाधव, सचिन नागटिळक यांसह अन्य उपस्थित होते.