‘शिवधर्म फाऊंडेशन’ची संभाजी ब्रिगेडला चेतावणी !

पुणे – महाराष्ट्रात ‘संभाजी ब्रिगेड’ या नावाने कार्यरत असलेल्या संघटना आणि पक्ष यांकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ने नावात पालट करून ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’, असे करावे किंवा संघटनेचे नाव पालटावे; अन्यथा राज्यभर आंदोलन करू’, अशी चेतावणी ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी दीपक काटे यांनी केली आहे. ३ एप्रिल २०२५ पासून पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड येथे तीव्र आंदोलन केले जाईल.
दीपक काटे म्हणाले की, ‘संभाजी ब्रिगेड’ छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकार्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करून, भेटी घेऊन पाठपुरावा केला आहे; मात्र संघटनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.