
कोल्हापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख नेहमी आदरार्थीच असला पाहिजे. असे असतांना ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या नावात हा उल्लेख एकरी आहे. या संदर्भात ब्रिगेडला भेटून आम्ही २ मासांपूर्वी निवेदन दिले आहे, तसेच शासन दरबारीही निवेदन दिले आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ने त्यांच्या नावात पालट करून ते ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’, असे करावे अन्यथा त्यांची संघटना आणि पक्षाची नोंदणी रहित करावी, अशी मागणी शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत केली. सकल हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. दीपक काटे म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी, या मागणीसाठी २२ एप्रिल या दिवशी आम्ही दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा काढणार आहोत. या अगोदरही आम्ही ‘संभाजी बिडी’च्या नावाच्या विरोधात यशस्वी आंदोलन केले आहे. संभाजी ब्रिगेड जर नावात पालट करण्यास सिद्ध नसेल, तर त्यांनी मान्यता रहित करावी, अशी मागणी आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, सर्वश्री विकास जाधव, विशाल पाटील, सौरभ निकम, अमेय भालकर यांसह अन्य उपस्थित होते.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !