पंतप्रधान मोदी यांच्या दौर्यातील अक्षम्य चूक म्हणजे योजनाबद्धरित्या करण्यात आलेले षड्यंत्र ! – माजी पोलीस महासंचालकांचे राष्ट्रपतींना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी भारतातील १६ माजी पोलीस महासंचालक आणि भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.