पुणे – येथील धनकवडी मधील वीर सावरकर चौकात ११ मार्च या दिवशी एका चहाच्या टपरीचे उद्घाटन होते. त्या वेळी त्या स्टॉलवर येणार्या प्रत्येकाला १ रुपयामध्ये चहा देण्यात येत होता. तो चहा पिण्यासाठी त्या चौकामध्ये प्रचंड गर्दी झाली होती आणि त्यामुळे वाहतूकही खोळंबली होती. त्या रांगेमध्ये पुढे-मागे जाण्यावरून लोकांमध्ये भांडणेही होत होती. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करून ते सर्व थांबवावे लागले, त्यांनी चहावाल्याला ते सर्व बंद करायला सांगितले. (यावरून लक्षात येते की, सरकारच्या विविध विनामूल्य योजनांमुळे लोकांना सवलतीच्या वस्तू मिळण्याची सवय झाली आहे. त्यामुळे लोक कुठल्याही थराला जात आहेत. अत्यंत स्वस्त मिळणार्या गोष्टींसाठी घंटोनघंटे रांगेत उभे रहाण्याची मानसिकता सिद्ध झाली आहे, हे गंभीर विचार करण्यासारखे सूत्र आहे ! – संपादक)