जळगाव येथे ४ भुकेल्या बैलांना कत्तलीसाठी पायी नेणार्‍या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !

प्रतीकात्मक चित्र

जळगाव – येथे ४ बैलांच्या मानेवर दोरीने घट्ट बांधून त्यांना भुकेल्या अवस्थेत कत्तलीसाठी पायी घेऊन जाणार्‍या शेख साबीर शेख मोती (वय २२ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने त्यांच्या चार्‍या-पाण्याचीही व्यवस्था केलेली नव्हती. या ४ बैलांचे मूल्य ८० सहस्र रुपये इतके आहे.

संपादकीय भूमिका 

अशांवर कठोर कारवाई करायला हवी !