देशात सर्वत्र ७२ वा प्रजासत्ताकदिन साजरा

नवी देहली – देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले. या संचालनामध्ये प्रथमच बांगलादेशाच्या सैन्याच्या एका तुकडीने सहभाग घेतला. यासह भारताच्या वायूदलात नव्याने समाविष्ट करण्यात आलेले ‘राफेल’ हे लढाऊ विमानही संचालनामध्ये सहभागी झाले होते. कोरोनामुळे गेल्या ५५ वर्षांत प्रथमच प्रजासत्ताकदिनी कुणीही विदेशी प्रमुख पाहुणे सहभागी झाले नाहीत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सैनिकांनी सलामी दिली. या वेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रीमंडळातील अन्य मंत्री, तसेच मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

( सौजन्य : DD national )