संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक !

 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे लागलेल्या आगीचे दृश्य

मुंबई – बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये काही मद्यपींनी मद्याच्या नशेत आग लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या ४-५ गाड्यांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला. दीड घंट्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले; पण यात उद्यानचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. आग लावणार्‍या मद्यपींचा पोलीस शोध घेत आहेत.