|

यवतमाळ, १५ मार्च (वार्ता.) – येथील बजरंग दलाचे यवतमाळ विभाग संयोजक भूपेंद्रसिंग परिहार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळच्या वतीने निवेदन दिले. वणी येथील गोमांसयुक्त बिर्याणी विक्री प्रकरणात घटनास्थळी मोमीनपुरा, वणी येथील जमिरखान मेहबूबखान या धर्मांधाने बजरंग दलाचे सहसंयोजक संतोष लक्षेट्टीवार यांच्या समवेत पोलीस कर्मचार्यांनाही मारहाण केली. एका पोलिसाच्या कानातून रक्त निघाले, तर दुसर्या पोलिसांचा गणवेश काढून गरागरा फिरवून त्याने पोलीस गणवेशाचा अवमान केला. तिसर्या पोलिसांच्या पार्श्वभागावर लाथ मारून दहशत निर्माण करून पडताळणी करणार्या कर्मचार्यांच्या कार्यात अडथळा निर्माण केला. ‘अशा धर्मांधांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल’, अशी चेतावणी दिली. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देऊन कारवाईची विनंती केली आहे. (धर्मांधांचा उद्दामपणा रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी ठोस पावले उचलावीत ! – संपादक)