|

मुंबई – दादर रेल्वेस्थानकात मद्यधुंद हमिदुल्ला मुख्तार शेख (वय २९ वर्षे) याने महिलेचा विनयभंग केला. प्रवाशांनी त्याला पकडून चोप दिला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिला लोकलची वाट पहात असतांना फलाट क्रमांक ८ वर हा प्रकार घडला. धर्मांधाने गर्दीचा अपलाभ घेत विनयभंग केला. पीडित महिलेने तात्काळ आरडाओरड केल्याने प्रवाशांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या कह्यात दिले. तो मूळचा झारखंडमधील रहिवासी आहे.