महाराष्ट्रात साधूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या उपस्थितीत येथील वाघंबरी मठामध्ये परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी हा निर्णय करण्यात आला आहे. राज्यात पालघरमध्ये २ साधूंची जमावाने हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नांदेडमध्ये एका मठाधिपतीची हत्या आणि संभाजीनगरमध्येही एका साधूंवर गावकर्यांनी आक्रमण केले होते.