राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वेर्णा येथील श्री महालसा मंदिराला भेट

गोवा मुक्तीदिन सोहळ्यासाठी आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वेर्णा येथील श्री महालसा मंदिराला सपत्नीक भेट देऊन देवीकडे सर्वांच्या उन्नतीसाठी प्रार्थना केली. पुरोहितांनी पारंपरिक गार्‍हाणे घालून राष्ट्रविकासाची मागणी केली.

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोनदिवसीय गोवा भेटीसाठी १९ डिसेंबर या दिवशी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.

गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि याचे श्रेय यापूर्वी गोव्यात शासन करणार्‍या सर्व सरकारांना जाते, असे प्रतिपादन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोमंतकियांना गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आज सोहळा

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने परंपरागत ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी कांपाल मैदानात होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आल्याने या कार्यकमाचे संपूर्ण गोमंतकियांसाठी सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित रहाणार

१९ डिसेंबर २०२० या दिवशी होणार्‍या ६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.