(स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावरून प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण.)

सोलापूर – अक्कलकोट येथील एका गावामधील काही लोकांनी भ्रमणभाषवर औरंगजेबाच्या चित्राचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी असे स्टेटस ठेवल्यामुळे १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. येथील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या घटनेविषयी सांगितले की, येथील गावांमध्ये काही जणांकडून औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचे प्रकार वाढले आहे. यातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.