महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जळगाव येथे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन !

जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांना श्रीफळ अर्पण !

श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवण्याच्या प्रसंगी उपस्थित धर्मप्रेमी

जळगाव, १५ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि मनुदेवी मंदिर संस्थान ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन २७ मार्च या दिवशी जळगाव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र श्री मनुदेवी देवस्थान येथे घेण्यात येणार आहे. या निमित्ताने मंगळग्रह मंदिर, पद्मालय मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री स्वामीनारायण, पारोळा बालाजी मंदिर, इस्कॉन यांसह जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर ट्रस्टींना निमंत्रण देण्यात आले आहे.

हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सकाळी जुने श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाचे जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, योग वेदांत समितीचे श्री. अनिल चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, डॉ. विरेन खडके, रवींद्र हेंबाडे यांसह धर्माभिमानी आणि असंख्य हिंदू उपस्थित होते.