‘राजापूरमध्ये जे घडले, त्यामागे सनातन संस्थेच्या प्रभावाचा परिणाम !’ – सरफराज अहमद

इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांचा ‘बीबीसी’तील वृत्तातून सनातनद्वेष उघड !

इतिहास अभ्यासक सरफराज अहमद

रत्नागिरी – १२ मार्च या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील शिमगोत्सवात होळीचे झाड नेण्याच्या पारंपरिक मिरवणुकीच्या वेळी मशिदीजवळ हिंदू आणि मुसलमान यांच्यात संघर्ष झाला. मशिदीच्या पायर्‍यांना होळीचे झाड टेकवण्याची वर्षानुवर्षांची जुनी परंपरा असतांनाही मशिदीचे फाटक बंद ठेवण्यात आले होते. परंपरेला फाटा देण्याच्या मुसलमानांच्या कृतीमुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी होळीचे झाड मशिदीच्या आवारात घुसवले. या घटनेवरून इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांचे वक्तव्य ‘बीबीसी’वरून प्रसारित करण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून सनातन संस्थेचा प्रभाव या पट्ट्यात आहे. राजापूरमध्ये जे घडले, ते काही एकाएकी घडलेले नाही. मागील काही वर्षांपासून अशी मानसिकता घडवली जात होती. हे सगळे होत असतांना अशा प्रकरांकडे धर्मनिरपेक्ष संघटना, संस्था, पक्ष यांनी दुर्लक्ष केले. आज त्याचे परिणाम दिसत असतांना त्यासंदर्भात काळजी किंवा चिंता व्यक्त केली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, अशा मनोविकृतीचे इतिहास अभ्यासक सरफराज अहमद ! राष्ट्र आणि धर्म यांसाठी गेली २५ वर्षे निःस्वार्थ वृत्तीने कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर अशी चिखलफेक करणे, यातून अहमद यांची वैचारिक पत काय असेल, याचा विचारच न केलेला बरा !
  • अशा हिंदुद्वेष्ट्या इतिहासतज्ञांना (?) भारतातील राष्ट्रप्रेमी आणि लोकशाहीप्रेमी प्रसारमाध्यमे जुमानत नसल्याने बीबीसीसारखी कट्टर हिंदुविरोधी प्रसारमाध्यमे त्यांना उचलून धरतात, यात काय आश्‍चर्य ?