खासदार उदयनराजे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली.
भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली.
मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमास प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई शहर सहसचिव अमोल इंगोले-देशमुख आणि वाशी विभागाचे अध्यक्ष अशोक भोसले यांनी केले होते. या प्रसंगी महाराष्ट्र सैनिक आणि मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेसाठी प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नसून प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्या राज्यात अशाच पद्धतीचे राजकारण चालू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचे आणि त्यावर मग राजकारण करायचे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
वीज देयक माफ न करण्याचा निर्णय वीज आस्थापनांसमवेत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेनदेन झाल्याशिवाय हे झाले नसेल. सर्व आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी केला.
वाशी पथकर नाका तोडफोड केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन न्यायालयाने ६ फेब्रुवारी या दिवशी १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर संमत केला. या वेळी राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे २६ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली.