दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…

तृतीय पंथियांसाठी विशेषत्वाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ‘इंद्रधनुष थीम’ मतदान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भेट दिली.  

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…

समद्धी महामार्गावर १८ एप्रिलला सकाळी सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन २ जण ठार, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत.

उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

उन्हातून मुलांना शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना सुटी घोषित करण्याचे निर्देश द्यावेत, असे या संदेशात राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राज ठाकरे यांनी घेतली अमित शहा यांची भेट !; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या खासदारांसमवेत बैठक !…

या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची माहिती राज ठाकरे किंवा भाजप यांच्याकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. साहजिकच ही भेट लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर असणार.

वसंत मोरे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा !

माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून वागणुकीवर आक्षेप घेतले जात होते. अशा ठिकाणी न राहिलेलेच बरे, असे वसंत मोरे यांनी १२ मार्चला मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

राज्य माझ्या हातात दिल्यास एकत्र मशिदींवरील भोंगे बंद करू ! – राज ठाकरे

येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.

छत्रपतींचे नाव घेतल्याने मुसलमानांची मते मिळणार नाहीत, असे पवारांना वाटायचे !

मी एका मुलाखतीत शरद पवार यांना ‘तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेता; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही’ असे म्हटले होते. त्यावर त्यांनी मौन साधले होते.

हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण हवे ! – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणा’साठी दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावून ‘मराठ्यांना १० टक्के आरक्षण’ देणारे विधेयक एकमताने संमत करण्यात आले; परंतु हे विधेयक अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना मान्य नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.