बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासासमवेत वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरुष ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

बाबासाहेबांना मी भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वर्णन केले.

राज्याच्या राजकारणात जातीचे सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मोठे झाले ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचे सूत्र मोठे झाले, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणातून कधीच इतिहासाला धक्का लावला नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १०० व्या वर्षांत पदार्पण

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ?

मुंबईसह राज्यातील अन्य पालिकांच्या निवडणुका लढवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.

आपले सत्ताधारी सतर्क नसल्यामुळे वर्ष २०२० पेक्षा वर्ष २०२१ भयंकर ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

जगावर आलेल्या या संकटाची कुणालाच कल्पना नव्हती. केवळ आपल्याकडून नव्हे, तर अमेरिका आणि युरोपिय देश यांच्याकडूनही चुका झाल्या; मात्र ते लवकर वठणीवर आले, आपण अद्यापही आलो नाही. ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’, हे आपल्याकडे झाले नाही.

रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठीच्या अत्यावश्यक साहित्याची खरेदी अन् वितरण यांचे दायित्व राज्यांवर सोपवावे !

रेमडेसिविर आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी अन् त्यांचे वितरण यांचे दायित्व राज्यांकडे द्यावे. साथरोगाविषयीचे व्यवस्थापन फार काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू !

आरोग्यक्षेत्राच्या व्यवस्थापनाचे धिंडवडे काढणारी घटना ! एकीकडे ऑक्सिजनअभावी, तर दुसरीकडे उपलब्ध ऑक्सिजनच्या गळतीमुळे नागरिकांचा मृत्यू होणे, यापेक्षा आरोग्ययंत्रणेला लज्जास्पद दुसरे काय असू शकते ? या घटनेस उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. ‘कुणाच्या सांगण्यावरून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली ?’ हा मूळ विषय आहे. त्याचे अन्वेषण होणार आहे का ?

…‘तर जनतेचा विश्‍वास कायमचा उडून आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ !’ – राज ठाकरे

या प्रकरणाचे राज्यात निष्पक्ष अन्वेषण होईल, याची मला मुळीच निश्‍चिती नाही. केंद्रशासनानेही नीट चौकशी केली नाही, तर मात्र जनतेचा विश्‍वास कायमचा उडेल आणि आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ, अशी चिंता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.