
सातारा, १ मार्च (वार्ता.) – भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप कळू शकले नाही; मात्र मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याचे बोलले जात आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. खासदार उदयनराजे हे प्रथमच ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.