PM Modi Appeals Bangladesh : बांगलादेशात लवकर निवडणुका घ्या !

बिम्सटेक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी महंमद युनूस यांची घेतली भेट !

पंतप्रधान मोदी आणि महंमद युनूस यांची भेट

बँकॉक (थायलंड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ एप्रिल या दिवशी येथे आयोजित ‘बिम्सटेक’ (बंगाल इनिशिएटिव फॉर सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन – बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) शिखर परिषदेत बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांच्याशी चर्चा केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशामध्ये झालेल्या सत्तापालटानंतर पंतप्रधान मोदी युनूस यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी युनूस यांना बांगलादेशात लवकर निवडणुका घेण्याचे आवाहन केले, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.

मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

पंतप्रधान मोदी यांनी युनूस यांना सांगितले की, ‘निवडणुका लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. बांगलादेश लवकरच लोकशाही आणि स्थिर सरकार पाहील, अशी आशा आहे.’ तसेच संबंधांना हानी पोचवू शकणारी विधाने टाळावीत, असेही मोदी यांनी युनूस यांना सांगितले.

अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवरही झाली चर्चा !

दोन्ही नेत्यांमध्ये बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी हे सूत्र उघडपणे उपस्थित केले. युनूस यांनी आश्वासन दिले की, बांगलादेश सरकार स्वतःचे दायित्व पार पाडेल.