राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी राज्य आरोग्य विभागाने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे सादर केला आहे. या अहवालानुसार गर्भवती मातेच्या मृत्यूस संबंधित रुग्णालयाचे दायित्व निश्चित करण्यात आले आहे. त्या प्रकरणी अंतिम अहवाल लवकरच येईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले. चाकणकर यांनी ७ एप्रिल या दिवशी वैद्यकीय आणि पोलीस अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.