आक्षेपार्ह विधानाविषयी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा नोंद !

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

दोडामार्ग तालुक्याचा आरोग्य सेवेचा प्रश्न खरच सुटला आहे का ?

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आरोग्य सेवेसारख्या मूलभूत सुविधेसाठी जनतेला आवाज उठवावा लागतो, हे दुर्दैव !

स्वराज्य घडवणार्‍या महाराजांचा महाराष्ट्र आता जातीपातींमध्ये वाटला गेला आहे ! – राज ठाकरे

पुण्यामध्ये कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघांतील मनसे उमेदवारांसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी जाहीर सभा घेतल्या. या वेळी त्यांनी आरक्षण आणि जातीच्या राजकारणाच्या सूत्राला हात घालत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

मशिदींवरील भोंग्यांचा लोकांना त्रास, त्याकडे धर्म म्हणून बघू नका !

‘मुंबई तक’ या डिजिटल वाहिनीवरील मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. या वाहिनीचे संपादक साहिल जोशी यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

PM in Nashik: जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस खरी राज्यघटनाद्रोही ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस हीच खरी राज्यघटनाद्रोही आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सार्वजनिक सभेत केली.

Trudeau ‘Will Be Gone’ : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे पुढील निवडणुकीत पतन होणार ! – इलॉन मस्क

वर्ष २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेल्या ट्रुडो यांना सध्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. कॅनडामध्ये अल्पमतातील सरकार चालवणार्‍या ट्रुडो यांच्यावर दबाव वाढत आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मतदानावर बहिष्कार…मनसेचे अनिल चित्रे ठाकरे गटात जाणार !..

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मतदानावर बहिष्कार…मनसेचे अनिल चित्रे ठाकरे गटात जाणार ! !..

…अशा लोकांना मतदारांनी व्यवस्थेबाहेर काढायला हवे !

मतदान न होणे, हे जेवढे वाईट आहे, तेवढेच किंवा त्याहीपेक्षा अधिक झालेल्या मतदानाचा आदर न करणे, हे वाईट आहे. मतदारांना नादी लावत राजकीय पक्ष मतदारांना खेळवत बसतात.

US Presidential Election Result : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष !

अमेरिकेतील नागरिकांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावर बसवून स्वतःच्या देशाचा विचार केल्याचेच यातून दिसून येत आहे. ट्रम्प अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांप्रमाणे  अन्य देशांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, हीच अपेक्षा आहे !

Maldives Recalls Diplomat : मालदीवने पाकमधून त्याच्या उच्चायुक्तांना माघारी बोलावले !

मालदीवने पाकमधील त्याचे उच्चायुक्त महंमद तोहा यांना माघारी बोलावले आहे. त्यांनी १ नोव्हेंबरला मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अनुमती न घेता इस्लामाबादमध्ये तालिबानी मुत्सद्दी सरदार अहमद साकिब याची भेट घेतली होती.