Nepal Pro-Monarchy Movement : नेपाळमध्ये राजेशाही पुनरुज्जीवित करण्याची तेथे राजेशाही समर्थकांकडून मोर्चे !

काठमांडू – नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये संपुष्टात आलेली २४० वर्षांची राजेशाही पुनरुज्जीवित करण्याची मागणी करण्यासाठी काठमांडू आणि नेपाळच्या इतर भागांत राजेशाही समर्थकांनी मोर्चे काढले.

१. या प्रकरणात नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादुर देऊबा म्हणाले, ‘‘राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने (आर्.पी.पी.ने) राजा ज्ञानेंद्र शहा यांना अध्यक्ष केले, तर त्यांना नंतर पश्चात्ताप होईल. ज्ञानेंद्र शहा यांना राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा. नेपाळमध्ये राजेशाही परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’

२. सत्ताधारी नेपाळी काँग्रेसनेही यावर तिची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेपाळच्या सध्याच्या राजकीय व्यवस्थेत पालट  करण्याची आवश्यकता नाही. नेपाळची राज्यघटना लोकशाही प्रजासत्ताक प्रणालीवर आधारित आहे. ही राज्यघटना लोकांनी निवडून दिलेल्या घटना सभेने सिद्ध केली आहे.

३.  २८ मार्च या दिवशी राजेशाही समर्थक आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे समर्थक यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची योजना आखली आहे.