केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या

केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य !

एस्.टी.चे खरे मारेकरी कोण ?

सर्वसामान्य जनता खासगी वाहतुकीकडे वळत आहे. याला कारण एस्.टी. महामंडळाचा गलथान कारभार आणि स्वार्थी राजकारण आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन करतांना राजकारण्यांनी प्रथम एस्.टी. महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन द्यावे. तसे झाले, तर अशी वेळ येणार नाही, हे निश्चित !

पाकच्या बुजगावण्या नेतृत्वाचा अस्त !

जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !

केंद्राच्या ३ कृषी कायद्यांना देशातील तब्बल ८६ टक्के शेतकर्‍यांचा होता पाठिंबा !

‘एवढी महत्त्वपूर्ण माहिती १ वर्ष का दडपून ठेवण्यात आली ?’, ‘जर बहुसंख्यांक शेतकर्‍यांचा कायद्यांना पाठिंबा होता, तर त्याचा विचार का करण्यात आला नाही ?’, ‘केंद्रावर असा कोणता दबाव होता की ज्यामुळे बहुसंख्यकांचा विचार केला गेला नाही ?’

ब्राह्मण समाजातील ७५ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अल्प !

या समाजाची अवस्था बिकट असल्याचा प्रमुख निष्कर्ष समोर आला आहे. बहुतांश ब्राह्मणांना हक्काचे घर नाही. उपजीविकेच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाल्याने राज्यातील ४५ सहस्रपैकी २२ सहस्र खेड्यांत ब्राह्मणांची घरेच नाहीत.

‘जमियत’ची चौकशी हवी !

जमियत आणि पीएफआय यांच्या कृतीतून भारतातील शासनव्यवस्था उद्ध्वस्त करून इस्लामी व्यवस्था स्थापण्याचे छुपे मनसुबे उघड होतात. भारतीय समाज ‘या संघटनांवर कारवाई होईल’, या आशेवर असाहाय्य होऊन पहात आहे, तेव्हा मोदी सरकारने भारतियांचा आक्रोश लक्षात घेऊन जमियतवर कारवाई करून देश सुरक्षित करावा, ही अपेक्षा !

‘आप’चा नेता आतंकवाद्यांच्या घरात सापडतो ! – राहुल गांधी यांचा आरोप

वर्ष २०१७ मध्ये निवडणुकीच्या काळात केजरीवाल पंजाबमधील मोगा येथे पूर्वी खलिस्तानी आतंकवादी असलेल्या व्यक्तीच्या घरी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून बुरखाधारी मुस्कान खान हिचे समर्थन

‘‘आम्ही कोणत्याही धार्मिक उन्मादाचे समर्थन करत नाही. प्रत्येक संस्थेचा गणवेश असतो. तेथे हिजाब किंवा अन्य काही चालत नाही आणि ते योग्यही नाही. काही कट्टरतावादी लोक मुलींचा उपयोग करून वाद निर्माण करून शांतता बिघडवत आहेत.’’

केरळमध्ये ‘केरळमधील माजी मुसलमान’ नावाच्या संघटनेची स्थापना !

अशी वृत्ते देशातील प्रसारमाध्यमे का प्रकाशित करत नाहीत ? कि अशा बातम्या छापल्यास त्यांच्या कथित धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का लागणार, असे त्यांना वाटते का ? भारताचे इस्लामीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी हिंदूसंघटन अपरिहार्य !

हिजाबच्या मागे सीएफ्आय आणि एसडीपीआय यांचा राजकीय स्वार्थ ! – भाजपचे आमदार रघुपती भट यांचा आरोप

‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.