|
|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये इस्लामचा त्याग करणार्यांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’ (केरळमधील माजी मुसलमान) या नावाने एक संघटना चालवली जात आहे. याचे अध्यक्ष डॉ. आरिफ हुसैन थेरुवथ आहेत.
केरळमधील आयशा मर्केराउज यांनी इस्लामचा त्याग करून त्या ‘नास्तिक’ म्हणून स्वतःची ओळख सांगत आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘गेली १० वर्षे मी यावर विचार करत होते. इस्लामविषयी माझ्या मनात अनेक प्रश्न होते. त्यानंतर मी महंमद पैगंबर यांचे चरित्र वाचले. तेव्हा मी इस्लाम सोडण्याचा विचार पक्का झाला. या चरित्रामध्ये मानवाधिकार नाकारण्यात आला आहे.’’ आयशा यांच्याप्रमाणे केरळमध्ये असे अनेक लोक आहेत, त्यांनी इस्लामचा त्याग केला आहे. अशांना कट्टरतावादी धर्मांधांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
(सौजन्य : Swarajya)
डॉ. आरिफ हुसैन थेरुवथ म्हणाले की, संपूर्ण देशात सहस्रो लोकांनी इस्लामचा त्याग केला आहे; मात्र ते उघडपणे बोलू शकत नाहीत. गेल्या वर्षभरात केरळमध्ये ३०० जणांनी इस्लामचा त्याग केला आहे. यांतील २०० जण आमच्या संपर्कात आहेत. ज्यांनी इस्लामचा त्याग केला आहे; मात्र आमच्या संपर्कात नाहीत, असेही बरेच जण असू शकतात. असे लोक त्यांची ओळख दाखवत नाहीत; कारण अशा लोकांना समाजात ‘काफीर’ (अल्ला आणि कुराण यांना न मानणारा) म्हणून हिणवले जाते. त्यांच्यावर बहिष्कार घातला जातो. त्यांना संपत्तीतून वगळले जाते. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरांवर त्रास दिला जातो.