कर्नाटकातील महाविद्यालयांत धर्मांध मुलींनी हिजाब घालून येण्याचे प्रकरण
अयोध्या (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हणून ओळखल्या जाणार्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने कर्नाटकातील हिजाब प्रकरणात हिंदु विद्यार्थ्यांसमोर ‘अल्ला हू अकबर’ म्हणणार्या मुस्कान खान या विद्यार्थिनीचे समर्थन केले आहे.
हिजाब विवाद में RSS की शाखा ने मुस्कान खान का समर्थन किया, हमारी संस्कृति है पर्दाhttps://t.co/LBSX7kd7K2
— Zee Salaam (@zeesalaamtweet) February 10, 2022
१. मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या अवध प्रांताचे संचालक अनिल सिंह यांनी सांगितले, ‘मुस्कान आमची मुलगी आणि बहीण आहे. आम्ही तिला संकटाच्या स्थितीत सोडू शकत नाही. हिंदु संस्कृती महिलांचा सन्मान करण्यास शिकवते. ज्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तो चुकीचा होता. (येथे) हिजाब अथवा पडदा पद्धत भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि हिंदु महिलाही त्यांच्या आवडीनुसार पडदा वापरतात.
२. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे नेते इंद्रेश कुमार म्हणाले, ‘‘आम्ही कोणत्याही धार्मिक उन्मादाचे समर्थन करत नाही. प्रत्येक संस्थेचा गणवेश असतो. तेथे हिजाब किंवा अन्य काही चालत नाही आणि ते योग्यही नाही. काही कट्टरतावादी लोक मुलींचा उपयोग करून वाद निर्माण करून शांतता बिघडवत आहेत.’’