Ban Halal In Maharashtra : भारतीय अर्थव्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घाला !  – आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटण व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापने कपडे, सौंदर्यप्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे पुष्कळ मोठे आक्रमण आहे.

गोवा : बोरी येथील भूमीच्या मालकांना सुनावणीसाठी बोलावले;  मात्र स्वत: अधिकारी अनुपस्थित !

ही आहे प्रशासकीय अधिकार्‍यांची जनतेप्रतीची संवेदनशीलता ! प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अशा वागण्याने जनतेत त्यांच्याविषयी कधी विश्‍वास निर्माण होईल का ? आणि त्यांचा पुलाला होणारा विरोध कधी मावळेल का ?

Hinduism By Will : सुरतकल (कर्नाटक) येथील मुसलमान तरुणीने स्वच्छेने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी केला विवाह !

सुरतकल येथील आयशा या मुसलमान तरुणीने बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत भंडारी यांच्याशी विवाह केला. आयशाने इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला आहे. या दोघांच्या विवाहाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.

शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध !

आळंदी – ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. यानुसार ‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, जैन संप्रदाय, तसेच विविध आध्यात्मिक संप्रदायांचे भाविक दु:खी झाले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला भाजप … Read more

‘खोके सरकार ४२०’ असल्याची विरोधकांची विधीमंडळाच्या बाहेर घोषणाबाजी !

खोके सरकार ४२०’च्या घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या इमारतीच्या बाहेर सत्ताधारी पक्षाचा निषेध केला.

हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे प्रयत्न चालूच !

धर्मांध मुसलमानांविषयी ढळढळीत दिसणार्‍या सत्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंना अप्रत्यक्षपणे दूषणे देणार्‍यांचे संमेलन म्हणजे ‘एक हत्ती आणि सहा आंधळे’, यातलाच प्रकार म्हणावा लागेल !

संपादकीय : नौदलदिनाचा अन्वयार्थ !

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्‍या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !

#BoycottSunburnFestival Goa : जैवविविधतेला हानी पोचवणार्‍या ‘सनबर्न’ला अनुमती देऊ नका !

सनबर्न महोत्सवासाठी डोंगरमाथ्यावरील झाडे तोडल्याने जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होतो. सर्वत्र कचर्‍याचा ढीग पडतो. वाहतुकीच्या प्रचंड कोंडीमुळे सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. तसेच येथील जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.

UNESCO Pakistan : ‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे ! – दारा शिकोह फाऊंडेशन

अलीगड येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

(म्हणे) ‘चीनशी स्पर्धा करण्यासाठीच भारत दुसरे स्वदेशी विमान वाहक जहाज बनवत आहे !’ – ‘ग्लोबल टाइम्स’

‘एखाद्या देशाच्या उदयामुळे आपल्यावर संकट ओढवू शकते’, या भयाने त्याच्याशी तुलना करून त्याला ही लेखण्याचा प्रयत्न केला जातो, असे मानसशास्त्र सांगते. चीनचाही हा केविलवाणा प्रयत्न …