हणजूण-कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीची मागणी

हणजूण (गोवा) : वागातोर येथे होऊ घातलेल्या आणि जैवविविधतेला हानी पोचवणार्या ‘सनबर्न’ महोत्सवाला अनुमती देऊ नये, अशी मागणी हणजूण-कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी केली आहे. समितीने या आशयाचे निवेदन पर्यटक संचालक, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि पंचायत यांना दिले आहे.
समितीच्या मते महोत्सवाच्या आयोजनासाठी डोंगरमाथ्यावरील झाडे तोडल्याने जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्हास होतो. महोत्सवानंतर या ठिकाणी कचर्याचा ढीग पडलेला असतो. महोत्सव परिसरात रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. महोत्सवाच्या आयोजनामुळे येथील जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. या कारणांसाठी महोत्सवाला अनुमती देऊ नये.
|
(सौजन्य : RDXGOA GOA NEWS)
|
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ