हिंदु तरुण बजरंग दलाचा कार्यकर्ता !
सुरतकल (कर्नाटक) – येथील आयशा या मुसलमान तरुणीने बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत भंडारी यांच्याशी विवाह केला. आयशाने इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला आहे. या दोघांच्या विवाहाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. या दोघांचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध चालू होते. आयशाच्या आईने त्यांच्या विवाहाला मान्यता दिली नव्हती. त्यानंतर आयशाने स्वेच्छेने प्रशांत यांच्याशी वैदिक पद्धतीने विवाह केला. आता तिचे नाव अक्षता ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे आयशाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली आहे. प्रशांत आणि आयशा यांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या विवाहाची माहिती दिली.
प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष !आयशा आणि प्रशांत यांच्या विवाहाचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी देतांना त्याला ‘रिव्हर्स लव्ह जिहाद’ असे संबोधले. वास्तविक लव्ह जिहाद हा हिंदुद्वेषातून मुसलमान तरुणांकडून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी केला जातो. यासाठी ते स्वतः हिंदु असल्याचे खोटे सांगतात, विवाहित असल्याची माहिती लपवतात, तसेच विवाहानंतर हिंदु तरुणीला धर्मांतर करण्यासाठी सांगून तिचा छळ करतात. असे असतांना प्रसारमाध्यमे हिंदु तरुणाने शुद्ध प्रेमातून मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावर त्यालाही लव्ह जिहाद संबोधणे हा हिंदुद्वेष आहे. याविरोधात हिंदु संघटनांनी वैध मार्गाने कृतीशील झाले पाहिजे. |