जळगाव येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी केळीची रोपे आणि रांगोळ्या यांची सजावट !

शुभकार्यात केळीची रोपे लावण्याची सनातन धर्मपरंपरा आहे. ती या परिषदेनिमित्त आलेल्या राज्यभरातील मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि अधिवक्ते यांना अनुभवायला मिळाली. सात्त्विक रांगोळ्यांनी परिषदेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेतील मान्‍यवरांचे मौलिक विचार !

केवळ महाराष्‍ट्रात नव्‍हे, तर भारतामध्‍ये मंदिरांविषयीचे प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. असंख्‍य मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्‍यामध्‍ये अहिंदु मंडळी विश्‍वस्‍त म्‍हणून नियुक्‍त केली जात आहेत. त्‍यामुळे मंदिरांतील प्राचीन परंपरा लोप पावत आहेत.

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद : मंदिर संस्‍कृतीच्‍या म्‍हणजेच धर्माच्‍या रक्षणाचे व्‍यासपीठ !

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद आयोजित करण्‍यामागची भूमिका, मंदिर सरकारीकरणाची स्‍थिती आणि मंदिरांचे संघटन उभे करण्‍याची आवश्‍यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली भूमिका या लेखाद्वारे देत आहोत.

विश्वस्तांनी एकत्रित कार्य केल्यास मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही ! – अशोक जैन, विश्वस्त, पद्मालय देवस्थान, जळगाव

मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.

जळगाव येथे राज्यस्तरीय मंदिर परिषदेला आजपासून प्रारंभ !

मंदिरे आणि मंदिरांतील धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ येथे आजपासून राज्यस्तरीय मंदिर परिषदेला प्रारंभ होत आहे. हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्थान विश्‍वस्त मंडळ (पद्मालय, जळगाव) यांच्या वतीने आयोजित ही परिषद ४ अन् ५ फेब्रुवारी या दिवशी शिरसोली रोड येथील ‘सुदर्शन पॅलेस’ सभागृहात होणार आहे.

जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात राज्यभरातून मंदिर विश्‍वस्त एकवटणार !