आजपासून ओझर (जिल्हा पुणे) येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ ! 

श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे लावण्यात आलेली स्वागत कमान

ओझर (जिल्हा पुणे) – ‘प्राचीन भारतीय मंदिर संस्कृती’चे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे, मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढणे, तसेच मंदिरांचे सुप्रबंधन व्हावे, या उद्देशाने २ आणि ३ डिसेंबर या दिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ६३५ हून अधिक निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, अभ्यासक सहभागी होणार आहेत. राज्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी यांचा १ डिसेंबरपासून येथे येण्यास प्रारंभ झाला आहे. या परिषदेची सिद्धता पूर्ण झाली असून दोन दिवसांच्या परिसंवादात मान्यवरांचे उद्बोधन, परिसंवाद आणि चर्चासत्रे होणार आहेत.

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील महत्त्वाची सूत्रे !

१. मंदिर क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या विश्वस्तांचा सन्मान

२. मंदिरांच्या संरक्षणार्थ परिसंवादांचे आयोजन

३. मंदिर विषयक धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन