नाशिक येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही वस्त्रसंहिता लागू होणार !

सप्तशृंगी देवी, नाशिक

नाशिक – येथील सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे.

यासाठी विश्वस्त मंडळातील काही सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भाविक सकारात्मक आहेत. त्यामुळे याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार, विश्वस्त अधिवक्ता ललित निकम आणि ग्रामस्थ यांनी केले आहे.

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)