भाजपने तमिळनाडूच नव्हे, तर देशभरातील सरकारीकरण केलेली मंदिरे मुक्त करावीत ! – हिंदु जनजागृती समिती
काँग्रेस सरकारच्या काळात विविध राज्यांतील सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांतील देवनिधी लुटण्यात आला, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यात आला. मशिदी आणि चर्च यांना वगळून हिंदूंच्या मंदिरांचेच सरकारीकरण करण्यात आले. हा अन्याय दूर करण्याचा आरंभ भाजपाने करावा.