हिंदूंच्या विरोधानंतर ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेमध्ये मुलांना रक्षाबंधन साजरे करण्यापासून अडवले !

कॉन्व्हेंट शाळांचा हिंदुद्वेष जाणा ! सरकारने अशा शाळांची अनुमती रहित करायला हवी, तरच यापुढे असे धाडस कुठल्या शाळा करणार नाही !

श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्री !

अ‍ॅमेझॉनकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे साहित्य विक्री केले जात असल्याने आता भारत सरकारने या आस्थापनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

‘अ‍ॅमेझॉन’कडून पाकिस्ताच्या ध्वजाची विक्री : नागपूरमध्ये मनसेकडून ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयाची तोडफोड !

शत्रूराष्ट्राची तळी उचलणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’वर सरकारने आता तरी तात्काळ बंदी आणावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

‘चंद्रयान-२’च्‍या अपयशावरून ‘बीबीसी’ने भारतावर केलेल्‍या टीकेचा जुना व्‍हिडिओ प्रसारित !

बीबीसीची भारतद्वेषी मानसिकता असल्याने तिच्याकडून याहून वेगळे काय घडणार ? अशा वृत्तवाहिनीवर भारतात बंदी घालणेच योग्य ठरील !

गुजरात दंगलीवरील वादग्रस्त माहितीपटासाठी बीबीसीवर कारवाई करण्याचे विधेयक गोवा विधानसभेत संमत

मुख्यमंत्र्यांनी ‘हा माहितीपट सार्वजनिक करू शकत नाही. त्यावर बंदी आहे’, याची जाणीव करून देतांना म्हटले की, ‘देशाच्या पंतप्रधानांना अवमानित केले जात आहे, त्याचे काही नाही. सर्व विरोधक मात्र बीबीसीला पाठिंबा द्यायला उभे रहात आहेत !’

देश आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात प्रभावी हिंदूसंघटनाद्वारे वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !

देश आणि धर्म यांवरील आघातांना रोखण्यासाठी ईश्वरी अधिष्ठान ठेवून लढा दिल्यास त्यात यश नक्कीच मिळते, हे लक्षात घ्या !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गीता प्रेसच्या अभिनंदनाचा, तर काँग्रेसच्या निषेधाचा प्रस्ताव एकमताने संमत !

काँग्रेसकडून भारतात हिंदूविरोधी वक्तव्य केले जाते, तर भारताबाहेर देशविरोधी वक्तव्य केले जाते. अशा काँग्रेसचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निषेध करते.

राजा हिंदुत्वनिष्ठ असणे, ही काळाची आवश्यकता ! – अभिनेते शरद पोंक्षे

ज्या दिवशी भारतात हिंदू ४९ टक्के होतील, त्या दिवशी निधर्मीवाद संपलेला असेल. बजरंग दलावर बंदी आणण्याचे आश्‍वासन देऊन काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर येते.

(म्हणे) ‘भारत सरकार ट्विटरवर बंदी घालणार होते !’ – ट्विटरचे हिंदुद्वेष्टे सहसंस्थापक जॅक डॉर्से

कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी सरकारविरोधी वार्तांकन करणार्‍यांची ट्विटर खाती बंद करण्याचा आदेश दिल्याचा दावा !