‘जर्मनीतील ‘डी.डब्ल्यू.’ या वृत्तवाहिनीने भारतातील कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराची घटना आणि त्याच्या निषेध यांविषयी तिसर्यांदा बातमी प्रसारित केली, म्हणजे जणूकाही इतरत्र कुठेही अशा घटना घडतच नाहीत. यासाठी भारतीय प्रसारमाध्यमे साहाय्य करत आहेत. त्यामुळे ही प्रसारमाध्यमे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून भारताचा अवमान करण्यासाठीच्या ‘टूलकीट’चा (विरोधाच्या प्रणालीचा) एक भाग म्हणून अशा घटनांचा वापर करत आहेत. अनेक भारतीय त्यांनी विणलेल्या भारतविरोधी जाळ्यात अडकतात आणि ‘आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत’, हे त्यांचे म्हणणे मान्य करतात. खरे म्हणजे ‘जगातील इतर अनेक जागांपेक्षा भारतात महिला अधिक सुरक्षित आहेत’, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले पाहिजे.
१. पाश्चात्त्य देशांमध्ये सर्वाधिक बलात्कार आणि गुन्हे होत असतांना भारताची अपकीर्ती का ?
आपल्याला काही प्रसंगांविषयी माहिती असली पाहिजे. मी याविषयी वर्ष २०१४ मध्ये लिहिले होते; परंतु आताच्या काळातही ते लागू पडते. जागतिक प्रसारमाध्यमे भारतातील बलात्काराच्या घटनांवर का लक्ष केंद्रित करत आहेत ? प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांवरून ‘भारतात होणारे बलात्कार ही मोठी समस्या आहे’, असे दाखवले जात असून त्यामध्ये ‘इतर देश भारताच्या जवळपासही नाहीत’, असे दाखवले जाते. जगात भारतातील बलात्काराच्या घटनेची बातमी नेहमी ‘भारतात अजून एक बलात्कार’, असा मथळा देऊन प्रसारित केली जाते. मी जर्मनीमध्ये असतांना २७ डिसेंबर २०१३ या दिवशी तेथील एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये शेवटची बातमी सांगतांना त्या बातमीला ‘भारतात अजून एक सामूहिक बलात्कार’, असा मथळा दिला होता. त्या वृत्तवाहिनीच्या १५ मिनिटांच्या कार्यक्रमात सांगितलेल्या ५ मुख्य विषयांपैकी हा एक विषय होता. ती बातमी वाचून ‘भारतात होणारा सामूहिक बलात्कार’, ही जर्मनीमध्ये मुख्य बातमी कशी होऊ शकते ? याचे माझ्या बहिणीलाही आश्चर्य वाटले. सर्वसाधारण अंदाज लावला, तर त्याच दिवशी संपूर्ण जगभरात बलात्काराच्या जवळजवळ १ सहस्र घटना घडल्या होत्या. अमेरिकेत २००, दक्षिण आफ्रिकेमध्ये १७० वगैरे. या आकडेवारीवरून भारतात होणार्या बलात्कारांच्या प्रमाणापेक्षा पाश्चिमात्य देशांतील शहरांमध्ये होणार्या बलात्कारांची टक्केवारी पुष्कळ अधिक आहे. यांपैकी अनेक घटना सामूहिक बलात्काराच्या असतील. अनेक प्रकरणांमध्ये पीडित मुलगी किंवा महिला हिची हत्या झालेली असते.
आजच्या घडीला पृथ्वीवर प्रत्येक क्षणी काय चालले आहे ?, हे जर आपल्याला कळले, तर एक माणूस दुसर्या माणसावर किती वेदना लादतो आहे ?, हे लक्षात येऊन आपल्याला ते सहन होणार नाही. जगभरात सगळीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असतांना आणि इतर देशांच्या तुलनेत अगदी अल्प प्रमाणात गुन्हे भारतात घडत असतांना ‘भारतात अजून एक सामूहिक बलात्कार’, असे सांगून भारताला या सर्वांपासून वेगळे करून त्याचा अवमान का केला जात आहे ? प्रत्यक्ष गुन्ह्यांच्या संख्येच्या दृष्टीने जर पाहिले, तर चीन हा देश सोडल्यास अमेरिकेच्या लोकसंख्येच्या ४ पटींनी असलेल्या भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या दृष्टीने ती संख्या अमेरिकेतील गुन्ह्यांच्या संख्येपेक्षा मोठी नाही; कारण लोकसंख्येच्या तुलनेत पाहिले, तर गुन्ह्यांचे प्रमाण असलेल्या देशांमध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे.
भारतातील कुटुंबव्यवस्थेचे अबाधित महत्त्व !
‘भारतातील बलात्काराची समस्या हाताळण्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही’, असे म्हणण्याचे धाडस देशातील पुष्कळ जण करणार नाहीत. खरे म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारताला अधिक लाभ आहे; कारण भारतातील कुटुंबव्यवस्था पुष्कळ बलवान आहे. विशेष करून ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेले नाही, त्या सर्वसाधारण लोकांविषयी हे दिसून येते. विवाह होण्यापूवी पुरुषांनी ब्रह्मचर्य राखणे आणि मुलींनी कौमार्य राखणे यांची आजही भारतात थट्टा न करता त्याला किंमत दिली जाते. ‘प्रेमसंबंध जुळून येणे, ही अजूनही तात्पुरती भावना असून जीवनभराचा जोडीदार मिळवण्यासाठी तो मजबूत पाया नाही’, यादृष्टीने अजूनही प्रेमसंबंधांकडे पाहिले जाते. ‘कुटुंबातील सदस्यांमधील तडजोड आणि त्याग यांमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येते’, असा निषेध केला जात नाही. बहुतांश हिंदु महिलांसाठी ‘सीता’ ही अजूनही आदर्श आहे. देवाची भक्ती आणि देवावर प्रेम करणे, हे अजूनही केले जात आहे.’
– मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक, जर्मनी.
२. भारतातील बलात्काराच्या घटनांचे वृत्त जगभर प्रसारित का केले गेले ?
१६ डिसेंबर २०१२ या दिवशी देहली येथे एका महिलेवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची लज्जास्पद घटना झाली. यानंतर भारतातील बलात्काराविषयीच्या घटनांची वृत्ते देण्याचा महापूर आला. या घटनेनंतर ६ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले. त्यांच्यापैकी एकाचा कारागृहात मृत्यू झाला, ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली आणि एकाची १८ वर्षे पूर्ण होण्यास ६ महिने शेष असल्याने अल्पवयीन म्हणून त्याला ३ वर्षांसाठी सुधारगृहात पाठवण्यात आले. ‘हा अल्पवयीन आरोपी सर्वांत क्रूर आणि त्या पीडितेची हत्या करण्यात उत्तरदायी असल्याने तो प्रौढ आहे’, असा दाखवण्याचा प्रयत्न झाला. या सामूहिक बलात्काराच्या बातमीला अभूतपूर्व प्रसिद्धी देण्यात आली. या घटनेचे वृत्त जगातील सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्यांमध्ये दाखवण्यात आले. हे वृत्त युरोपमधील स्लोव्हेनिया येथील एरव्ही जागरूक नसणार्या माझ्या मैत्रिणीकडेही पोचले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वृत्त सर्व जगभर प्रसारित का केले गेले ? या घटनेविषयी भारतियांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केल्यामुळे हे झाले का ? असा निषेध झाला, ही भारताच्या बाजूने जमेची बाजू होती; कारण बलात्कारासारखी घटना ही त्यांच्या (हिंदु) संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचे भारतीय मानतात; परंतु इथे उलटेच घडले.
३. पाश्चात्त्यांकडून जाणीवपूर्वक बलात्काराच्या घटनांसाठी भारतीय (हिंदु) संस्कृतीला दोष दिला जाणे !
डिसेंबर २०१२ नंतर भारताविषयीच्या बातम्यांमध्ये ‘अजून एक बलात्कार’ किंवा काही वेळा ‘भारताची बलात्कारी संस्कृती’, असे मथळे असलेल्या बातम्यांवर अधिक प्रमाणात भर देण्यात येऊ लागला. त्यानंतर एका वर्षाने देहलीत १६ डिसेंबर २०१२ या दिवशी बलात्कार झालेल्या पीडितेच्या दुःखदायक घटनेची अर्धा पान बातमी जर्मनीतील न्यूरेंमबर्ग येथील स्थानिक वृत्तपत्रात छापली गेली. ‘स्पायगर्ल’ या मासिकाच्या वर्षाच्या शेवटी घेतल्या गेलेल्या आढाव्यामध्ये ‘भारतामधील उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये ७०० जणांचा मृत्यू झाला’, वगैरे बातम्या घेण्याऐवजी ‘लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे मार्शल आर्ट्स शिकणार्या विद्यार्थिनी लैंगिक अत्याचाराची शिकार झाली’, याचे वृत्त घेण्यात आले. ही वृत्तपत्रे प्राधान्याने महिलांचा विनयभंग झाल्याच्या बातम्या देतात. यावरून ‘भारतात प्रत्येक कोपर्यात महिलांचा विनयभंग करणारे लपलेले आहेत’, असा आभास निर्माण होतो.
बलात्कार ही समस्या भारताप्रमाणे इतर देशांमध्येही आहे. तरीही जागतिक प्रसारमाध्यमांकडून केवळ ‘भारतातील बलात्कार’ यावर भर दिला जाणे, हे न्याय नाही, तसेच यामागे काही छुपा हेतू असल्याचा संशय निर्माण होतो. अनेक वेळा भारतियांकडून लिहिल्या गेलेल्या आणि सध्या छापण्यात येणार्या लेखांमध्ये गुन्हेगार म्हणून हिंदूंच्या नावांचा उल्लेख असतो. त्यामुळे बलात्काराच्या घटनांसाठी भारतीय (हिंदु) संस्कृतीला दोष दिला जातो. ‘भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना स्वायत्तता नाही, म्हणजे त्यांना हवे ते त्या करू शकत नाहीत’, असा अर्थ काढला जातो. ‘लैंगिक हिंसाचार हा भारतातील लोकांना लागलेला रोग आहे’, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने घोषित केले. ‘रॉयटर्स ट्रस्ट लॉ ग्रुप’ या गटाने ‘महिलांसाठी सर्वांत वाईट देश’, असे भारताचे नामकरण केले आहे. भारतियांची लैंगिकतेविषयीची मानसिकता पालटण्यासाठी ‘पौगंडावस्थेतील शिक्षण’ देण्याविषयी हॉवर्ड समितीने अनेक उपाययोजना सुचवल्या. हा अतिरेक झाला. पाश्चिमात्य हे त्यांचा पूर्वीचा आणि आताचा इतिहास यांचा अभ्यास करून त्याची तुलना भारताशी करतील का ? त्यांना याविषयी लाज वाटत नाही का ?
जर एखाद्याने हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला, तर ‘बलात्कार ही भारताची संस्कृती नाही’ आणि इतर संस्कृती अन् देश धरले, तर त्यांच्या तुलनेत भारतामध्ये महिलांना अधिक प्रमाणात चांगले मानाचे स्थान आहे, हे त्यांच्या लगेच लक्षात येईल. कदाचित् स्त्रीवादी सांगतात त्या म्हणण्याशी हे मानाचे स्थान जुळत नसेल; परंतु सर्व गोष्टींमध्ये स्त्रीवादी सर्वश्रेष्ठ आहेत का ? भारतातील खेड्यांमध्ये रहाणार्या महिलांना स्त्रीवाद्यांप्रमाणे व्हायचे आहे का ? माझ्या दृष्टीने सीता हा आपला आदर्श मानणार्या खेड्यांतील महिलांच्या दृष्टीने स्त्रीवाद्यांची अवस्था दयनीय आहे. स्त्री म्हणून असलेल्या वेदनेपक्षा गरिबी ही या महिलांची प्रमुख वेदना आहे.
बलात्काराच्या बातम्यांमध्ये मुसलमानांचे नाव न दाखवता हिंदूंचे नाव दाखवले जाणे !
‘पारंपरिक भारतीय संस्कृतीला न्यून दाखवण्यासाठी जवळजवळ प्रत्येक दिवशी ‘अजून एक बलात्कार’, ही आकाशओळ प्रसारित करण्यात येते. यामध्ये ‘बलात्कार करणार्यांपैकी केवळ हिंदूंची नावे प्रकाशात आणली जाऊन त्याची दूरचित्रवाहिनीवरून चर्चा होईल’, याची दक्षता घेतली जाते. भारतात जवळजवळ २० कोटी मुसलमान आणि जवळजवळ २ कोटी ८० लाखांहून अधिक ख्रिस्ती आहेत. त्यांपैकी अनेक जण बलात्कार करतात आणि क्रूर आहेत. उदाहरणार्थ वर्ष २०१२ मध्ये देहलीतील पीडितेच्या बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन मुलगा मुसलमान आहे; परंतु ही बातमी मुख्य बातमी प्रवाहामध्ये दिली जात नाही. गुन्ह्यांविषयी बातम्या प्रसारित करतांना किंवा गुन्ह्यांची नोंद करतांना जातीयवाद केला जातो. यावरून हिंदु संस्कृतीचा अपमान करून ‘त्यात सुधारणा करायला पाहिजे’, असे सांगून संस्कृतीला उघडे पाडणे, हा हेतू असल्याचे स्पष्ट होते. जुन्या पद्धतीची कौटुंबिक मूल्ये बाजूला ठेवून मुक्त लैंगिकता ही सर्वसाधारण गोष्ट आहे, हे दाखवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये कंडोम आणि ‘व्हेंडिंग मशिन्स’ ठेवणे, हे अपेक्षित आहे, असे दाखवतात. असे असेल, तर बलात्काराविषयी अजून काय बोलायचे राहिले ? यातून पाश्चिमात्यांना पौगंडावस्थेतील शिक्षणासाठी अभ्यासक्रम सिद्ध करण्यासाठी पार्श्वभूमी सिद्ध करायला मिळेल आणि एकदा का युववर्गाला हे पटले की, ‘मागासलेली’ हिंदु संस्कृती ही भूतकाळात जाईल.
– मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक, जर्मनी.
४. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म यांच्यापेक्षा हिंदु संस्कृती कित्येक पटींनी श्रेष्ठ !
भारतीय संस्कृतीला दोष देणे, हे निरर्थक आणि अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. खरे म्हणजे ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म नसते अन् केवळ हिंदु संस्कृती प्रबळ असती, तर आज जग अजून चांगल्या स्थानावर असले असते. ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी पारंपरिकरित्या युद्धासाठी ‘बलात्कार’ या साधनाचा वापर केला आहे. ‘इतर धर्मीय जरी सुसंस्कृत असले, तरी इतर धर्मातील स्त्री विचार करण्याएवढी पात्र नसून तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करून तिला ठार मारू शकतो’, असे त्यांना वाटते. हा रानटीपणा थांबवणे, हा जिनिव्हा परिषदेचा हेतू होता. हिंदूंना मात्र जिनिव्हा परिषदेची आवश्यकता कधीच भासली नाही. तेही युद्धे लढले; परंतु त्यांनी कधीही महिला किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्याविषयी क्रूरपणा दाखवला नाही.
५. भारताची प्रतिमा कलंकित करण्याचा हेतू आहे का ?
भारताला आहे त्यापेक्षा अधिक वाईट दाखवण्याच्या मोहिमेला या माध्यमांच्या दुर्दैवाने यश आले नाही. बहुतांश विदेशी नागरिक आणि काही भारतीय नागरिक यांना ‘जगातील इतरत्र कोणत्याही देशापेक्षा भारतामध्ये महिला अत्यंत भयानक जीवन जगत आहेत’, याची निश्चिती वाटत आहे, ही वस्तूस्थिती आहे. त्याला ते मान्यता देणार नाहीत, असे होणार नाही. प्रत्येक जण तुम्हाला याविषयीची भयानक उदाहरणे देऊन तुमचे तोंड बंद करील. हो, अशी भयानक उदाहरणे आहेत आणि त्याची कारणे अन् त्यावर उपाययोजना शोधून काढण्याची आवश्यकता आहे. भारतात गुन्हेगारी करणार्यांचे प्रमाण अल्प आहे आणि वैयक्तिक स्तरावर गुन्हेगारी करणारे, म्हणजे संपूर्ण राष्ट्र नव्हे ! इतर राष्ट्रांमध्ये अशा गुन्हेगारांचे प्रमाण तुलनात्मक दृष्टीने अधिक आहे. त्यामुळे ‘अजून एक सामूहिक बलात्कार’, असे म्हणून पुन्हा पुन्हा भारताला का झोडपले जात आहे ? यामागे भारताची प्रतिमा कलंकित करण्याचा हेतू आहे का ? आणि जर तो असेल तर, का ?
६. पाश्चिमात्य मूल्यांची छाननी करण्याची वेळ आली आहे !
अलीकडच्या काळात भारतियांनी चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतात प्रचंड बुद्धीमत्ता आहे. ‘भारतियांचा मेंदू अत्यंत तल्लख आहे’, या गोष्टीला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे नव्या आत्मविश्वासाने भारत व्यक्त होत आहे. आता पाश्चिमात्य मूल्यांची छाननी केली पाहिजे. प्राचीन हिंदु परंपरेचे पुनर्जागरण होत आहे. ‘ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म हे हिंदु धर्मापेक्षा चांगले आहेत’, या प्रस्थापित विचाराला आता आव्हान दिले जात आहे. आधुनिक पाश्चिमात्य मूल्यांची छाननी होण्याची शक्यता आहे; कारण पाश्चिमात्यांना आता ती मूल्ये आवडत नाहीत. प्रस्थापित विचारांना अधिक शक्ती असते आणि या शक्तीचा उपयोग अत्यंत अयोग्य पद्धतीने भारताची निंदानालस्ती करण्यासाठी केला जात आहे.
७. आधुनिक पाश्चिमात्य मूल्यांची दयनीय वस्तूस्थिती
भारतामध्ये ही सर्व मूल्ये अजूनही बलवान आहेत, याची पाश्चिमात्य दृष्टीकोनातून विचार व्यक्त करणारे प्रशंसा करत नाहीत; कारण भारतात प्रोत्साहन दिल्या जाणार्या पाश्चिमात्य जीवनशैलीला ही मूल्ये आव्हान देतात. ‘आधुनिक पाश्चिमात्य मूल्ये, म्हणजे उदाहरणार्थ (‘फोकस’ नावाच्या जर्मन मासिकातून मला ही माहिती मिळाली) इंद्रधनुष्यातील रंग किंवा निरनिराळ्या रंगाची कापडे जोडून सिद्ध केलेल्या कपड्याप्रमाणे असलेल्या कुटुंबात रहावे’, अशी आहे. या कुटुंबांमध्ये सदस्य असणारे समलिंगी पालक असतील किंवा पालक म्हणून वेगवेगळे भागीदार असलेल्यांची किंवा अनेक‘ लिव्ह इन रिलेशनशिप’ (लग्न न करता एकत्र रहाणे) असलेल्यांची मुले असतील. प्रत्येकासाठी तो शिकण्याचा चांगला अनुभव आहे, असे गृहीत धरले जाते. पुरुष आणि महिला एकत्र येऊन पालकत्व करण्यापेक्षा समलिंगी हे चांगले पालक आहेत का ? याचे परीक्षण करणारे पुस्तक आता जर्मनीतून कालबाह्य होत आहे. असे समलिंगी पालक एकत्र येऊन मुले निर्माण करू शकत नाहीत, या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे; पण पाश्चिमात्य देशांमध्ये मुले कुणाला हवी असतात ?, हाही एक प्रश्न आहे.
८. पाश्चात्त्यांच्या आधुनिक मूल्यांच्या तुलनेत हिंदूंची मूल्ये अधिक प्रमाणात श्रेयस्कर !
भारतीय समाजातील सर्व धर्मातील सर्वसाधारण लोकांसाठी ही संभावना अतिशय भयानक गोष्ट आहे. काही दृष्टीकोनांविषयी हिंदु समाज हा कडक आहे आणि त्याला सुधारण्यास वाव आहे; परंतु पाश्चात्त्यांच्या आधुनिक मूल्यांच्या तुलनेत हिंदु समाजातील मूल्ये अधिक प्रमाणात श्रेयस्कर आहेत. आधुनिक जीवनशैली हा अयशस्वी ठरलेला आदर्श आहे, याविषयी युवकांमध्ये जाणीव होणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये अनेक खेदजनक त्रुटी आहेत. अनेक तरुण युवक अतीस्वातंत्र्य असल्याने दिशाहीन आहेत. ते स्पष्ट नियमांची अपेक्षा करतात आणि मूलतत्त्ववादी किंवा ख्रिस्ती धर्मातील चर्चकडे वळतात. यासाठी हिंदु धर्म हा चांगला पर्याय आहे; परंतु ते पूर्वग्रह न ठेवता त्याविषयी जाणून घेतील, अशी शक्यता नाही. ’
– मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक, जर्मनी.