भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !
कॉमिला (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपावर धर्मांधांनी आक्रमण करून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच मंडपाची नासधूस करण्यास आली. कुराणाचा अवमान केल्याची अफवा पसरवून हे आक्रमण करण्यात आले.
कॉमिला (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपावर धर्मांधांनी आक्रमण करून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच मंडपाची नासधूस करण्यास आली. कुराणाचा अवमान केल्याची अफवा पसरवून हे आक्रमण करण्यात आले.
हिंदूंनो, या यशाविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! हिंदु धर्माच्या होत असलेल्या अनादराच्या प्रत्येक प्रकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करणे, हे आपले धर्मकर्तव्य असून ते बजावल्यास आपली साधनाही होणार आहे, हे लक्षात घ्या !
श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हटल्याच्या प्रकरणी फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथील भीम आर्मीचा नेता अनिल चौधरी याला अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीने त्याने ट्वीट करून क्षमा मागण्याचा प्रयत्न केला होता.
हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारे चुकीचे संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणारा कल्याण (पूर्व) भागातील सिद्धार्थनगर येथील श्रेयस मगर याच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कापूर बनवणार्या एका आस्थापनाने विविध प्रसारमाध्यमांतून (दूरदर्शन, वेबसाईट, यू ट्यूब) स्वत:च्या कापूर उत्पादनाच्या विज्ञापनासाठी प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेल्या कलाकाराचा वापर केला आहे. वेश श्रीरामाचा आणि वर्तन सामान्य युवकासारखे दाखवून विनोद निर्माण करून श्री रामभक्तांच्या भावनांची थट्टा केली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होणे, हे लज्जास्पद आहे. हिंदूंनो अशा कार्यक्रमांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध होणे अपेक्षित होते !
आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !
हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान करणार्या कपड्यांवर बंदी घातली पाहिजे ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने असे कपडे घातल्याने धार्मिकता वाढत नाही, तर धर्माचा अवमान होतो, हे हिंदूंच्या लक्षात येत नाही !
मध्यप्रदेशातील महू शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘अनिवार्य’ नावाच्या खासगी संस्थेकडून बसवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीच्या हातामध्ये महिलांच्या मासिक धर्माच्या वेळी वापरत असलेले ‘सॅनिटरी नॅपकिन’ ठेवल्यामुळे हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.
हिंदूंना आतापर्यंत हिंदूंच्या संघटना, धार्मिक संघटना, धर्मगुरु आदींनी धर्मशिक्षण न दिल्याचाचा हा परिणाम आहे. अन्य धर्मियांना धर्मशिक्षण मिळत असल्याने ते कधीही स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान करत नाहीत उलट कुणी प्रयत्न केला, तर थेट कायदा हातात घेतात !